कुंभेज फाटा येथे ‘धनलक्ष्मी स्टील ट्रेडर्स’चा दिमाखात शुभारंभ ; अक्कलकोटचे नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन
अक्कलकोटचे स्वामी समर्थ देवस्थानचे चेअरमन ,माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश मालक इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन
कुंभेज, दि. ११ (करमाळा-LIVE)-
ग्राहकांना स्टील आणि हार्डवेअर क्षेत्रातील विविध प्रकारचे साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कुंभेज फाटा (ता. करमाळा) येथे सुरू करण्यात आलेल्या ‘धनलक्ष्मी स्टील ट्रेडर्स आणि हार्डवेअर’ या नूतन व्यावसायिक दालनाचा शुभारंभ दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अक्कलकोटचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आणि श्री स्वामी समर्थ देवस्थान, अक्कलकोटचे चेअरमन श्री.महेश मालक इंगळे यांच्या हस्ते फीत कापून तर डॉ गणेश करे-पाटील, कार्यकारी अभियंता मधुकर सुर्वे, यांच्या प्रमुख उपस्थितीत या दालनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उद्घाटक महेश मालक इंगळे यांनी भोसले परिवाराला नवीन व्यवसायाच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. व्यवसायात ग्राहकांचा विश्वास, दर्जेदार साहित्य आणि उत्तम सेवा या बाबींना प्राधान्य दिल्यास निश्चितच यश मिळते, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असून आपण या व्यवसायात सदैव प्रगती करत राहाल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . याप्रसंगी त्यांनी धनलक्ष्मी फर्मचे प्रमुख मार्गदर्शक श्री बाळासाहेब भोसले यांना श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र व प्रसाद देऊन सन्मानित केले.
धनलक्ष्मी स्टील ट्रेडर्सचे प्रोप्रायटर बाळासाहेब भोसले, प्रवीण बाळासाहेब भोसले आणि संजय बाळासाहेब भोसले यांच्या वतीने महेश मालक इंगळे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कुंभेज फाटा परिसरातील ग्राहकांना स्टील आणि हार्डवेअर साहित्याच्या खरेदीसाठी एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध होणार असल्याने या नव्या व्यावसायिक दालनाचे उपस्थितांनी स्वागत केले.
या उद्घाटन सोहळ्यास यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील, प्राचार्य मिलिंद फंड, प्राचार्य बाळासाहेब नरारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता मधुकर सुर्वे, माजी सरपंच राजूशेठ गादिया, प्रसन्नशेठ बलदोटा, अजयकुमार देशमुख, कल्याणराव साळुंके सर, ग्रामपंचायत सदस्य गुरुदास सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते अनिलशेठ कादगे , समाजकल्याण विभागाचे अधिकारी युवराज भोसले, सहाय्यक उपनिबंधक तात्यासाहेब भोसले, मेजर बिभीषण कन्हेरे, कानिफनाथ गुटाळ, कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळाचे संचालक महादेव कामटे, सुभाष इंगोले, प्रगतशील बागायतदार संभाजी भोसले, भारत पवार, बाबा सुरवसे, अंकुश केत, रमेश शिंदे सर, केतन भोसले, गणेश सुर्वे, अभिजित भोसले, अतुल भोसले, बाबासाहेब माळी, नानासाहेब भोसले, सतीश चौगुले, नानासाहेब तोरमल, यून्नूस पठाण,यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, व्यापारी, नागरिक व भोसले परिवाराचे आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या या नव्या व्यवसायामुळे कुंभेज फाटा परिसरातील व्यापारपेठेला नवी चालना मिळण्यास मदत होणार असून, धनलक्ष्मी स्टील ट्रेडर्सच्या माध्यमातून ग्राहकांना दर्जेदार साहित्य आणि विश्वासार्ह सेवा मिळेल, असा विश्वास उपस्थितानी यावेळी व्यक्त केला.




