जेऊर एमएसईब (MSEB) चा वीजेचा घोटाळा काही थांबेना ; ऐन उन्हाळ्यात जेऊरकरांचे हालनियमन सुरू- लाईट बील मात्र वेळेत भरण्याची तंबी
जेऊर, दि. २३ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील ३३ केव्ही एमएसईब चा सतत होणाऱ्या घोटाळ्यामुळे जेऊरकर हैराण झालेले असून ऐन उन्हाळ्यात जेऊरकरांचे हालनियमन सुरू झालेले आहे. तर लाईट बील वेळेत नाही भरले तर एमएसईब कडून लाईट कनेक्शन तोडले जात आहे.
गेल्या तीन-चार महिन्यापासून जेऊर येथील ३३ केव्ही एमएसईब चे कर्मचारी दररोज काहीना काही घोटाळ्याचे कारणे देऊन वीज खंडित करत असून यामुळे लोक हैराण झालेले आहेत. कडाक्याच्या उन्हाळ्यात दिवसातील कमीतकमी ८ ते १० तास वीज खंडित केली जात आहे.
दुसरीकडे वीज बील भरले नाही तर लगेचच लाईट तोडली जात आहे. त्यामुळे जेऊर परिसरातील नागरिक हैराण झालेले आहेत. जेऊर एमएसईब चे घोटाळे कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.






