प्रज्ञाशोध परीक्षेत वांगी- ४ चा ओमराजे कारंडे तालुक्यात प्रथम
जेऊर, दि. २४ (करमाळा-LIVE)-
सोलापूर जिल्हा परिषदेकडून घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी नं. ४ येथील इयत्ता तिसरी मधील विद्यार्थी ओमराजे दीपक कारंडे याने २०० पैकी १८२ गुण मिळवून सोलापूर जिल्ह्यात नववा तर करमाळा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे.
त्याला शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक महेश साळुंखे व सहशिक्षक देवीदास भोंग तसेच पालक दिपक कारंडे यांचे मार्गदर्शन मिळाले.
त्याच्या यशाबद्दल सरपंच सविता सुळ, माजी सरपंच स्वाती शेळके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश शेटे, उपाध्यक्ष संदीप सरडे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ग्रामस्थ व वांगी केंद्राचे केंद्र प्रमुख दामाजी श्रीरामे, शिक्षण विस्तार अधिकरी जयवंत नलवडे, करमाळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी नितीन कदम यांनी कौतुक केले आहे.






