शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अन् पीक विमा तात्काळ द्यावा- अन्यथा घंटानाद आंदोलन

करमाळा, दि. १६ (करमाळा-LIVE)- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अन् पीक विमा तात्काळ द्यावा अन्यथा येत्या शुक्रवारी तहसील कार्यालय येथे सर्वपक्षीय घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे.
शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी आणि पिक विमा मिळण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते व क्रांतिकारक शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल घुमरे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदन प्रसंगी रासप जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, क्रांतिकारक शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल घुमरे, रयत क्रांती संघाचे अजय बागल, ज्ञानेश्वर बनसोडे, सागर अंबारे, अमोल बागल, अशोक नवघरे, तानाजी शिंदे , शांतीलाल मोरे, राम धायतोंडे, भगवान डोंबाळे, शंकर सुळ, विष्णू राऊत सह पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील शेतकरी आज आर्थिक संकटाच्या विळख्यात सापडला आहे.वेळेवर पाऊस नसून मध्येच अवकाळी अतिवृष्टीमुळे व शेती उत्पादनाचा वाढता खर्च, शेतीमालाला न मिळणारा योग्य भाव, नैसर्गिक आपत्ती तसेच कर्जाचा वाढलेला आर्थिक बोजा, खते, बी, औषधे आणि मशागत मजूरीने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी नेते राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर, शेतकरी नेते रविकांत तुपकर, आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी, अन्नत्याग आंदोलन, निषेधार्थ मोर्चा आंदोलन, सारखी आंदोलन केली. तरी देखील हे सरकार शेतकऱ्यांची थट्टा करतंय का काय? मागिल निवडणूक काळात भाजप सरकारने जाहीर वचननामा म्हटले की आमचं सरकार आलं की आम्ही शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफी करू मात्र तसे झाले नाही. शासनाने जी कर्जमाफी जाहीर केली ती पूर्णपणे फसवी? तोंडाला पाने पुसली आहे? यांचा गरीब शेतकऱ्यांना फायदा होत नाही. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मकाने संपूर्ण कर्जमाफी करून त्यांना आर्थिक दिलासा द्यावा.तसेच पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना योग्य व वेळेत नुकसान भरपाई मिळावी.
अशा विविध मागण्यासाठी करमाळा तहसील येथे शुक्रवारी सर्व पक्षीयच्या वतीने एकदिवसीय घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. आमच्या न्यायिक मागण्या शेतकरी हिताच्या असून आमच्या मागण्या आपण शासन स्तरावर मांडून शेतकऱ्यांना न्याय्य मिळावा अन्यथा सर्व पक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल आसा इशारा राष्ट्रीय समाज पक्ष क्रांतिकारक शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे दिला आहे.




