कुंभेजच्या बागल विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जेऊर, दि. २१ (करमाळा-LIVE)-
कुंभेज येथील दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालयात २१ जून रोजी बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत पाटील होते.
यावेळी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक विष्णू पोळ यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगून विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
विद्यार्थिनी कु.आकांक्षा तानाजी क्षीरसागर व कु. प्रणिती प्रदीप पवार यांनी उत्कृष्ट योगासने सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.
मुख्याध्यापक पाटील यांनी योगामुळे शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य सुदृढ राहते तसेच एकाग्रता, आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढते, असे प्रतिपादन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत योगाभ्यास केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कल्याणराव साळुंके, सिताराम बनसोडे, संतोष शिंदे, विष्णू पोळ, दादा जाधव यांनी मार्गदर्शन केले.
कर्मचारीवृंद किशोर कदम, संतोष घोरपडे, नंदकुमार कांबळे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प करण्यात आला.




