08/06/2025

राजुरीचे सुपुत्र गणेश मोरे यांचा “झाड” चित्रपट २१ जूनला होणार रिलीज

0
IMG-20240518-WA0033.jpg

करमाळा, दि. १९ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील राजुरी गावचे सुपुत्र गणेश मोरे यांचा ‘झाड’ हा मराठी चित्रपट २१ जून रोजी महाराष्ट्र आणि गोवा या राज्यात प्रदर्शीत होणार आहे.

वाढतं तापमान, काँक्रिटीकरण, घटती वनराई यामुळे पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशातच वनसंपदेच्या जपवणूकीचा मुद्दा आता चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. झाडाचे महत्त्व सध्या काय आहे यावर हा चित्रपट आधारित आहे.

योगेश लिलाधर राजपूत यांनी प्रस्तुती व द ग्रीन इंडिया फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सचिन बन्सीधर डोईफोडे यांनीच केलं आहे. गणेश मोरे चित्रपटाचे सहदिग्दर्शक आहेत तर सतीश सांडभोर यांनी छायांकन, शरद ठोंबरे, पी. शंकरम यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.

आदर्श शिंदे आणि जान्हवी अरोरा यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. चित्रपटात डॉ. दिलीप डोईफोडे, प्रकाश धोत्रे, संदीप वायबसे, शिवलिंगआप्पा बेंबळकर, कैलास मुंडे, प्रल्हाद उजागरे, प्रशांत मुरकुटे, संजीवकुमार मेसवाल, जोशना नेहरकर, दुर्वास चौरे, दत्तात्रय मुंडे, देवई डोईफोडे, मच्छिंद्र डोईफोडे, प्रियंका नेहरकर, ओमकार डोईफोडे, करण डोईफोडे, माऊली सानप, काजल डोईफोडे, पंकजा वायबसे, जान्हवी कदम, राजवी डोईफोडे, आर्यन हजारे अशी स्टारकास्ट आहे.

चित्रपटाचं डिजिटल मार्केटिंग आनंद मुरुगकर व Distrubuter चे काम फिलमस्त्रा यानी केलं व पब्लिसिटी दर्शन मुसळे हे बघत असून “झाड” वाचवण्यासाठी, झाड लावण्यासाठी आणि झाड जगवण्यासाठी केलेला संघर्ष, पर्यावरण संवर्धनाचा या देशाला दिलेला कानमंत्र असं या चित्रपटाचं आशयसूत्र आहे.

आजवर चित्रपटांतून सामाजिक विषय हाताळले गेले असले, तरी पर्यावरण संवर्धन, झाडांचं जतन-संगोपन हा विषय चित्रपटातून मांडला गेल्याचं फारसं पाहायला मिळालेलं नाही. त्यामुळे आजच्या ज्वलंत आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयाची मांडणी “झाड” या चित्रपटातून कशी करण्यात आली आहे, याबाबत नक्कीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page