22/06/2026

करमाळा : बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि अंगणवाडी सेविकांचा सन्मान

0
IMG-20260621-WA0032.jpg

करमाळा, दि. २२ (करमाळा-LIVE)-
करमाळा बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि अंगणवाडी सेविकांचा सन्मान करण्यात आला आहे.

गेल्या पाच वर्षांपासून दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा सन्मान सोहळा बहुजन मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने राबविण्यात येत आहे.

तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणात पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळावी आणि समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या अंगणवाडी सेविकांचे कार्य गौरवले जावे या उद्देशाने बहुजन मराठी पत्रकार संघाच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाला दक्षिण सोलापूर गटविकास अधिकारी मनोज राऊत, यशकल्याणीचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील, एपीआय बालाजी वळसणे, ॲड बाबुराव हिरडे, माजी सैनिक अक्रुर शिंदे, बालविकास प्रकल्प पर्यवेक्षक भारती प्रचंडराव, डॉ.महेश अभंग आदी उपस्थित होते.

तसेच बहुजन मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा आशाताई चांदणे, उपाध्यक्ष प्रमिला जाधव, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब भिसे, सोलापूर जिल्हा सचिव आबासाहेब झिंजाडे, सोलापूर जिल्हा सदस्या आतकर मॅडम, करमाळा तालुका अध्यक्ष प्रमोद खराडे, तालुका उपाध्यक्ष दादासाहेब शिंदे, तालुका कार्याध्यक्ष संभाजी शिंदे, तालुका सदस्य सचिन नवले, तालुका सदस्य माधुरी कुंभार, तालुका सदस्य शोभाताई मारवाडी, वणवे मॕडम, नम्रता चांदणे उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्हा सचिव आबासाहेब झिंजाडे यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब शिंदे यांनी आणि आभार बाळासाहेब भिसे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page