जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूल मध्ये योग दिन उत्साहात साजरा
जेऊर, दि. २१ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूलमध्ये योग दिनानिमित्त मोठ्या उत्साहाने योगासने सादर करण्यात आली.
त्यावेळी लहान मुलांना येतील अशी योगासने मुलांकडून प्रात्यक्षिकद्वारे करून घेण्यात आली.
यामध्ये ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, शवासन योगमुद्रासन इत्यादी वेगवेगळ्या प्रकारांची सोपी असणे विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आली यावेळी सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षक उपस्थित होते तसेच योग दिनाचे महत्त्वही सांगण्यात आले.
यावेळी योगासने का करावी याचे महत्त्व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना सांगितले व दररोज या आसनांचा सराव करण्याचेही मुलांना सांगितले.








